पाचशे-हजाराच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयचे नवे नियम

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयनं आता नवे नियम जारी केले आहेत.

Updated: Nov 24, 2016, 08:18 PM IST
पाचशे-हजाराच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयचे नवे नियम   title=

नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांबाबत आरबीआयनं आता नवे नियम जारी केले आहेत. 15 डिसेंबरपर्यंत पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बदलता येणार आहेत. तसंच टोल, हॉस्पिटल, पेट्रोल पंपावर पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चालणार आहेत.

तर एक हजार रुपयाच्या नोटा आता फक्त बँकेच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहेत. आरबीआयनं ही घोषणा केली आहे. याबरोबरच उद्या म्हणजेच शुक्रवारपासून पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा या फक्त जमा करता येणार आहेत पण या नोटा बदलून मिळणार नाहीत.