भारतीय नौदलाची बोट बुडाली, चौकशीचे आदेश

गुरुवारी रात्री विशाखापट्टनमच्या समुद्रतटाजवळ भारतीय नौदलाची एक बोट बुडाल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत नाविकाचा मृत्यू झालाय तर इतर चार जण बेपत्त आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.

Updated: Nov 7, 2014, 06:42 PM IST
भारतीय नौदलाची बोट बुडाली, चौकशीचे आदेश title=

नवी दिल्ली : गुरुवारी रात्री विशाखापट्टनमच्या समुद्रतटाजवळ भारतीय नौदलाची एक बोट बुडाल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत नाविकाचा मृत्यू झालाय तर इतर चार जण बेपत्त आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.

नौसेनेनं दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजता विशाखापट्टनमजवळीत समुद्रतटाजवळ एक टॉरपीडो रिकव्हरी बोट बुडालीय. यानंतर, सेशेल्सच्या चार दिवसांच्या यात्रेवर गेलेले नौसेनेचे प्रमुख चीफ अॅडमिरल आर. के. धवन यांनी तात्काळ आपला दौरा रद्द करून परतण्याचा निर्णय घेतलाय. 

बोर्ड ऑफ इन्क्वायरी या दुर्घटनेबद्दल चौकशी करणार आहे. ३१ वर्षांपूर्वीची ही बोट नक्की कोणत्या कारणामुळे बुडाली याचा यामध्ये शोध घेतला जाणार आहे. या बोटीच्या एका कम्पार्टमेंटमध्ये पाणी भरल्यानं ही बोट बुडाली असं समजतंय.

दरम्यान, बचाव अभियानादरम्यान चालक दलातील एका सदस्याचा मृत्यू झालाय... चार जवान अद्यापही बेपत्ता आहेत तर २३ लोकांना बचाव अभियानादरम्यान सुरक्षितरित्या वाचवण्यात यश आलंय. 

टॉरपीडो रिकव्हरी वेसल (टीआरव्ही) हे एक सहाय्यक जहाज असतं. याचा वापर मोठ्ठी जहाजं आणि पानबुड्यांच्या अभ्यासादरम्यान डागलेले टॉरपीडो एकत्रित करण्यासाठी केला जातो. या जहाजाचं निर्माण १९८३ मध्ये गोवा शिपयार्डद्वारे करण्यात आलं होतं. या जहाजानं ३१ वर्षांपर्यंत भारतीय नौसेनेची सेवा केलीय. गेल्या काही महिन्यांमध्ये नौसेनेत अशा अनेक दुर्घटनांना सामोरं जावं लागलंय.

याच पद्धतीच्या दुर्घटनेनंतर अॅडमिरल डी. के. जोशी यांच्या राजीनाम्यानंतर यावर्षी १७ एप्रिल रोजी अॅडमिरल आर. के. धवन यांनी नौसेनंच्या प्रमुख पदाची सूत्रं हाती घेतली होती. अॅडमिरल जोशी यांनी आयएनएस ‘सिंधुरत्ना’वर लागलेल्या आगीनंतर लगेचच या दुर्घटनेची जबाबदारी घेत राजीनामा सोपवला होता. या दुर्घटनेत दोन नाविकांचा मृत्यू झाला होता. 

तसंच गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी ‘आयएनएस कोरा’ची विशाखापट्टनमच्या जवळच एका व्यावसायिक बोटीबरोबर टक्कर झाली होती. त्यामुळे, काही नुकसानही झालं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.