www.24taas.com, झी मीडिया, हरिद्वार
दिल्लीच्या मोहिमेवर निघालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी हरिद्वार येथे सर्वधर्मसमभावचा पुकारा केला. ‘मी केवळ हिंदुचाच नेताही’ अस सेक्युलरवादी वक्तव्य त्यांनी केले.
‘समाजातील एका विशिष्ट समूहाला डोळ्यासमोर ठेवून मी कधीच काम केले नाही. ‘हिंदु भवंतु सुखीन:’ यावर माझा कधीच विश्वास नव्हता तर ‘सर्व भंवतु सुखीन:’ हेच माझे मार्गदर्शक तत्व राहिले आहे’ अशी आपली सर्वधर्मसमभाव असलेली भावना त्यांनी लोकांसमोर मांडली.
नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल, केरळनंतर हरीदवारला पोहचले. रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाच्या नव्या शिक्षणसंस्थेचे उद्घाटन करण्यासाठी मोदी तेथे गेले होते. त्यांनंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी आपली सेक्युलरवादी भूमिका मांडली. या सभेत मोरारी बापू, परमार्थ निकेतनचे प्रमुख स्वामी चिदानंद सरस्वती उपस्थित होते.