'उंदीर बाहेर काढण्यासाठीच डोंगर पोखरला'

नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

Updated: Dec 30, 2016, 05:13 PM IST
'उंदीर बाहेर काढण्यासाठीच डोंगर पोखरला' title=

नवी दिल्ली : नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मोदींनी केलेली नोटबंदी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढण्याचा प्रकार असल्याचं चिदंबरम म्हणाले होते. या टीकेला मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

उंदीर बाहेर काढण्यासाठीच डोंगर पोखरल्याचं पंतप्रधान म्हणाले आहेत. या उंदरानीच देश पोखरला होता, त्यांना बाहेर काढायचं होतं म्हणून नोटबंदी केल्याचं पंतप्रधान म्हणाले आहेत. तसंच तीन वर्षांपूर्वी पैसा गेल्याचा चर्चा व्हायच्या पण आता पैसा आल्याच्या चर्चा होत असल्याचा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.

नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये डिजीटल योजनेचा लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉच्या माध्यमातून पुढच्या 100 दिवसांमध्ये 340 कोटी रुपयांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला या योजनेचा फायनल लकी ड्रॉ निघणार आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं भीम अॅपही लॉन्च करण्यात आलं. या अॅपच्या माध्यमातून डिजीटल पेमेंट शक्य होणार आहे.