विघ्न येण्यापूर्वीच रडू लागते ही मूर्ती!

हिमाचल प्रदेशच्या कानाकोपऱ्यांत देवी देवतांचा निवास असल्याचं मानलं जातं... याच्या अनेक कहाण्याही चांगल्याच प्रसिद्ध आहेत. अशीच एक कहाणी शक्तीपिठांपैंकी एक असलेल्या ब्रिजेश्वरी देवी माता मंदिर कांगडाशीही निगडीत आहे.

Updated: May 12, 2016, 04:35 PM IST
विघ्न येण्यापूर्वीच रडू लागते ही मूर्ती!  title=

मुंबई : हिमाचल प्रदेशच्या कानाकोपऱ्यांत देवी देवतांचा निवास असल्याचं मानलं जातं... याच्या अनेक कहाण्याही चांगल्याच प्रसिद्ध आहेत. अशीच एक कहाणी शक्तीपिठांपैंकी एक असलेल्या ब्रिजेश्वरी देवी माता मंदिर कांगडाशीही निगडीत आहे.

...आणि मूर्ती रडू लागते

या मंदिरात भगवान लाल भैरवासोबत एक देवीचीही मूर्ती आहे... जेव्हा कधी या ठिकाणी एखादं विघ्न घोंघावत असतं तेव्हा आपोआप भैरव देवाच्या मूर्ती रडू लागते... ही मूर्ती घामाघूम होते, असं सांगितलं जातं. 

पाच हजार वर्ष जुनी मूर्ती

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा चमत्कार इथं अनेकदा पाहायला मिळालाय. उल्लेखनय म्हणजे ही मूर्ती जवळपास पाच हजार वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं. मूर्ती रडू लागल्यानंतर लगेचच मंदिराचे पुजारी होम-हवनाचं आयोजन करतात. 

भैरव जयंती

१९७६-७७ मध्ये ही मूर्ती रडताना पाहायला मिळाली होती... संपूर्ण मूर्ती घामानं निथळली होती, त्यावेळी कांगडामध्ये बाजारात भीषण अग्निकांड घडून आलं होतं. त्यामध्ये खूप मोठं नुकसानही झालं होतं. त्यानंतर अशी विपरित परिस्थिती टाळण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये भैरव जयंती साजरी केली जाते.