`मंदिर उभारणीसाठी मुस्लिम समुदाय स्वत:च विरोध सोडणार`

केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदाय आपला विरोध सोडून देईल, अशी आशा आता विश्व हिंदू परिषदेला (व्हिएचपी) निर्माण झालीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 10, 2014, 07:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदाय स्वत:हून आपला विरोध सोडून देईल, अशी आशा आता विश्व हिंदू परिषदेला (व्हिएचपी) निर्माण झालीय.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय यांनी पत्रकारांशी बोलताना ही आशा व्यक्त केलीय. ‘आमचा पूर्ण विश्वास आहे की मुस्लिम समुदाय या सत्य घटनेला स्वीकारेल... आम्ही धार्मिक भावनांचा सन्मान करतो... ते मंदिर उभारण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतील’ असं राय यांनी म्हटलंय.
मोदी सरकारच्या परदेश नीतीबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राय यांनी आपण शेजारी देशांशी नेहमीच मित्रत्वाचे संबंध ठेवायला हवेत, असं उत्तर दिलं. मित्रत्व आणि शत्रुत्व हे दोन्ही गोष्टी सतत बदलत असतात, असं अटलजी म्हणत असत. परंतु, शेजाऱ्यांशी संबंध चांगलेच असायला हवेत, असं राय यांनी म्हटलंय.
जम्मू-काश्मीरशी निगडीत वादग्रस्त कलम 370 बद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, देशात तिसऱ्या पिढीला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या या कलमाबद्दल फारशी माहिती नसेल. याबद्दल केवळ त्यांनाच माहिती आहे ज्यांनी हे कलम लागू केलंय आणि अशा परिस्थिती या कलमाबद्दल चर्चा होत असेल, तर हे स्वागतार्हच आहे, असं राय यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.