नवी दिल्ली : देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळी सण मोठ्या उत्साहसोबत साजरा होतो आहे. वाराणसीमध्ये याच निमित्ताने वरुणानगर कॉलोनीमध्ये विशाल भारत संस्थानमध्ये मुस्लीम महिलांनी भगवान श्रीरामांची पूजा करत दिवे पेटवले आणि भारतीय जवानांना शक्ती देण्याची प्रार्थना केली.
भगवान श्रीराम अयोध्येत जेव्हा आले होते तेव्हा आनंद साजरा केला जात होता. दिवाळीच्या या दिवसांमध्ये आजच्या या दिनाला विशेष महत्त्व आहे. हनुमान चालीसा फेम नाजनीन अंसारी यांनी उर्दूमध्ये लिहिलेल्या भगवान रामाची आरती यावेळेस करण्यात आली.देशात कोणीच उपाशीपोटी झोपू नये अशी प्रार्थना करत धान्य वाटप केलं गेलं.
मुस्लिम महिला फाउंडेशन नॅशनलच्या नाजनीन यांनी म्हटलं की, रावणाचा वध करुन श्री रामांनी अधर्मावर विजय मिळवला. भारतीय सभ्यता, संस्कृती आणि एकतेचा यापेक्षा अधिक चांगला संदेश असू शकत नाही. एकतेचा संदेश राम आरतीमधून देण्यात आला.