www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलंय, जर ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सीट बेल्ट लावला असता, तर ते वाचले असते.
गोपीनाथ मुंडे यांचं मंगळवारी एका कार अपघातात निधन झालं.
अंत्यसंस्कारासाठी बीडला जात असतांना हर्षवर्धन यांनी सांगितलं, एका चुकीच्या समजामुळे मी माझा मित्र गमावला आहे, जास्तच जास्त लोकांना असं वाटतं की, मागच्या सीटवरचा बेल्ट हा फक्त दिखावा असतो. खरं म्हणजे मागच्या सीटचा बेल्टही तेवढाच महत्वाचा आहे, जेवढ्या पहिल्या सीटचा.
मंगळवारी त्यांच्या कारला दुसऱ्या कारने एका बाजून धडक दिली आणि काही मिनिटांत गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं.
समोरील कारने सिग्नल न पाळल्याने अपघात झाल्याचंही सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.