www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांकडून मुंबईसह अहमदाबाद, दिल्ली आणि सुरत या चार शहरांमध्ये अतिरेकी हल्ला होण्याची शक्यदता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या चार प्रमुख शहरांमध्ये अतिरेकी हल्ल्यांचा इशारा गुप्तचर विभागाने (आयबी) दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह गुजरात आणि संबंधित राज्य सरकारांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील खांडवा येथील कारागृहातून दोन दिवसांपूर्वी ‘इंडियन मुजाहिदीन`चे सहा अतिरेकी फरार झाले आहेत. त्यांच्याकडूनच घातपात घडविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.
‘आयबी`ने मंगळवारी हा इशारा देऊन बुधवारी यासंबंधीचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात ‘आयएम`च्या अतिरेक्यांनी याशहरांतील काही भागांचा अभ्यास करून त्यांची पाहणी केली असल्याचे ‘आयबी`ने म्हटले आहे. या इशाऱ्यानंतर गुजरात सरकारने अहमदाबाद व सुरतमध्ये घातपात घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.