मान्सूनची प्रतिक्षा वाढणार

मान्सूनचं केरळमधलं आगमन काहीसं लांबण्याचा अंदाज आता भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

Updated: May 15, 2016, 04:32 PM IST
मान्सूनची प्रतिक्षा वाढणार title=

मुंबई: मान्सूनचं केरळमधलं आगमन काहीसं लांबण्याचा अंदाज आता भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा वरूणराजा यंदा 7 जूनपर्यंत केरळमध्ये येईल असा अंदाज हवामान विभागानं मांडलाय.

या अंदाजात 4 दिवस पुढे आणि 4 दिवस मागे जाण्याची शक्यता आहे. 2005 ते 2015 या 11 वर्षापैकी दहा वेळा मान्सूच्या आगमनाचे भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेले अंदाज अचूक ठरले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2015मध्ये मात्र हा अंदाज चुकला होता.