तुमच्या आधार कार्डात 'ऑनलाईन' करा दुरुस्ती

तुमच्या आधारकार्डावर तुमच्या नावात, पत्त्यात किंवा आणखी माहितीत काही चुका आढळल्यास तुम्हाला आता वैताग करून घ्यावा लागणार नाहीय... कारण, आता ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया होणार असल्यानं तुमचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.

Updated: Jan 20, 2015, 01:18 PM IST
तुमच्या आधार कार्डात 'ऑनलाईन' करा दुरुस्ती title=

मुंबई : तुमच्या आधारकार्डावर तुमच्या नावात, पत्त्यात किंवा आणखी माहितीत काही चुका आढळल्यास तुम्हाला आता वैताग करून घ्यावा लागणार नाहीय... कारण, आता ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया होणार असल्यानं तुमचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.

बँकेत खातं उघडण्यापासून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससारख्या गरजेच्या सेवा मिळवण्यासाठी आधारकार्ड उपयोगी पडतं... पण, याच आधारकार्डावर नाव, पत्ता, लिंक, मोबाईल नंबर, जन्म दिनांक यांसारख्या विविध चुका असल्यास त्या तुम्ही स्वत: दुरुस्त करू शकाल. 

तुमच्या आसपास कुठेही इंटरनेट उपलब्ध असेल तर ही प्रक्रिया तुम्ही एका जागेवर बसून पूर्ण करू शकाल. यासाठी तुम्हाला uidai.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. 

- वेबसाईटवर खाली डाव्या बाजुला लिहिलेल्या your aadhar data वर क्लिक करा

- इथं तुम्हाला जी माहिती अपडेट करायचीय त्याबद्दल विचारलं जाईल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये 'सबमिट युअर अपडेट'वर क्लिक करा.

- 'enter your aadhar number'वर तुमचा आधार क्रमांक टाका

- टेक्स्ट व्हिरिफिकेशनमध्ये स्क्रीनवर दाखवलेले स्पेशल कॅरेक्टर टाका आणि 'ओटीपी'वर क्लिक करा

- याच्या पुढच्या पेजवर मोबाईल नंबर टाकण्याचे संकेत मिळतील. काही वेळात तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर 'ओटीपी'चा मॅसेज येईल. हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निर्धारीत बॉक्समध्ये नोंदवावा लागेल. यानंतर वेबसाईट लॉग इन करा.

- डाटा अपडेटवर क्लिक केल्यानंतर प्रोसेस्डवर क्लिक केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रांची क्लिअर फोटो किंवा स्कॅन करून अपलोड करावे लागतील.

- यानंतर 'कन्फर्म'वर क्लिक करण्याचे आदेश मिळतील. यानंतर 'बीपीओ सर्व्हिस प्रोव्हायडर'वर क्लिक करा. जिथे बाजुला लिहिलेल्या एजिस आणि कार्विसला निवडून सबमिट करावं लागेल. 

- अपडेट झाल्यानंतर मोबाईलवर मॅसेज येईल. यामध्ये तुम्हाला 'यूआरएन' नंबर मिळेल. अपडेट स्टेटसवर आधार कार्ड नंबर आणि यूआरएन टाईप करावा लागेल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.