सेल्फी काढण्याच्या बहाण्याने पत्नीची हत्या

सेल्फीचा बहाणा करुन एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला नदीत बुडवून मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. चोरांनी आम्हाला लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा विरोध केला म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि माझ्य़ा पत्नीला नदीत ढकलून दिलं अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली होती. पण चौकशी केल्यानंतर हे सत्य समोर आलं की पतीनेच त्याच्या पत्नीची हत्या केली.

Updated: Jun 1, 2016, 05:08 PM IST
सेल्फी काढण्याच्या बहाण्याने पत्नीची हत्या title=

मेरठ : सेल्फीचा बहाणा करुन एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला नदीत बुडवून मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. चोरांनी आम्हाला लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा विरोध केला म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि माझ्य़ा पत्नीला नदीत ढकलून दिलं अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली होती. पण चौकशी केल्यानंतर हे सत्य समोर आलं की पतीनेच त्याच्या पत्नीची हत्या केली.

उत्तर प्रदेशातील मेरठ शहरामधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षापूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. त्यांना ८ महिन्याचा मुलगा देखील आहे.

पोलिसांना चौकशीमध्ये आफताबची भूमिका संशयास्पद वाटली आणि त्यानंतर त्याने पत्नीचा खून केल्याचं सत्य समोर आलं. पोलिसांनी जेव्हा याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने हत्येची कबूली दिली. त्यानंतर त्याच्या मोठ्या भावासह त्याला हुंडा मागण्याच्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली.