'भारत माता की जय' म्हणजे काय रे भाऊ?

'भारत माता की जय' म्हणजे काय रे भाऊ, असं विचारण्याची खरं...

Updated: Mar 21, 2016, 10:52 PM IST

मुंबई : 'भारत माता की जय' म्हणजे काय रे भाऊ, असं विचारण्याची खरं तर गरज आजपर्यंत नव्हती पण, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' म्हणणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हा विषय चर्चेला आला आहे.

'भारत एक खोज' हे पुस्तक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलं, यात 'भारत माता की जय' म्हणजे काय याचा संदर्भ देण्यात आला आहे. 

'भारत एक खोज' यावर ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी  दूरदर्शनसाठी 'भारत एक खोज' नावाच्या मालिकेची निर्मिती केली होती. यात पंडित नेहरू यांनी भारत माता की जय या घोषवाक्याचा अर्थ सांगितला आहे, व्हिडीओत पाहा नेहरूंनी त्यावेळी नेमकं काय सांगितलं होतं...