दिल्लीत संसद परिसरात लागलेली भीषण आग आटोक्यात

संसदभवन परिसरातील स्वागत कक्षाजवळ असलेल्या एसी प्लांटला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. शॉकसर्कीटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

Updated: Mar 22, 2015, 10:18 PM IST
दिल्लीत संसद परिसरात लागलेली भीषण आग आटोक्यात title=

नवी दिल्ली: संसदभवन परिसरातील स्वागत कक्षाजवळ असलेल्या एसी प्लांटला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. शॉकसर्कीटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

परिसरातील छोट्या दुकानदारांना ही आग लागल्याचं प्रथम लक्षात आलं. आज सुट्टीचा दिवस असल्यानं या परिसरात फारशी वर्दळ नव्हती. आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवलं. 

आज दुपारी संसदेच्या रिसेप्शन कार्यालयाजवळ भीषण आग लागली. झाडांमुळे आगीचे लोण वेगानं पसरले असून धूरानं संसदेच्या परिसर व्यापला होता. आगीमुळं संसदेतील मुख्य इमारतीला कोणतंही नुकसान झालेलं नाही, असं स्पष्टीकरण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.