देशाच्या अर्थव्यवस्थेची मनमोहन सिंग यांना चिंता

देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Updated: Jan 30, 2017, 08:44 PM IST
देशाच्या अर्थव्यवस्थेची मनमोहन सिंग यांना चिंता  title=

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचा आरोप यावेळी मनमोहन सिंग यांनी केलाय.

मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी केला आहे. आर्थिक सर्वेक्षणात सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गुलाबी चित्र रंगवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सरकारला देशातील आर्थिक समस्यांबाबत सवाल केले पाहिजेत असंही मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांनी म्हटलं आहे. दरम्यान डॉ. मनमोहन सिंग आणि चिदंबरम हे अपयशी अर्थतज्ज्ञ असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलाय.