बाईकसाठी पत्नीला विकलं, अनेक वेळा तिला विकलं

मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी आपल्या पत्नीला केवळ ५० हजार रुपयांमध्ये विकण्याचा प्रकार समोर आला आहे.

Updated: Jul 1, 2014, 03:26 PM IST
बाईकसाठी पत्नीला विकलं, अनेक वेळा तिला विकलं title=

बैतुल, मध्यप्रदेश : मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी आपल्या पत्नीला केवळ ५० हजार रुपयांमध्ये विकण्याचा प्रकार समोर आला आहे. 

युवकाच्या सासऱ्याने आपली मुलगी गायब झाल्याची पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी त्या तरुणीला शोधून काढले. या प्रकरणातील दोषींचा तपास सुरू आहे. 

या प्रकरणाविषयी माहिती देतना डीएसपी उत्तम चौकसे यांनी सांगितले, की आमला ठाण्याचे क्षेता रामू आदिवासी याने आपल्या मुलीचा चार वर्षापूर्वी साहबलाल उइके याच्याशी विवाह केला होता. दीड वर्षापूर्वी या दोघांना एक मूल झाले. काही महिन्यापूर्वी राधा अचानक गायब झाली. या वेळी राधाने एका नातेवाईकाला फोन करून स्वतः विकले असल्याची माहिती दिली. 

साहबलाल याने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी राजगढ जिल्ह्यातील दोघांना आपल्या पत्नीला ५० हजार रुपयांना विकले. दलालांच्या माध्यमातून या महिलेची एका पेक्षा अधिक वेळा विक्री करण्यात आली. शेवटी एका व्यक्तीने तिला विकत घेऊन तिच्याशी लग्नही केलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.