'देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?'

देशासाठी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधींनी बलिदान केलं, देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का? 

Updated: Feb 6, 2017, 05:39 PM IST
'देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?' title=

नवी दिल्ली : देशासाठी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधींनी बलिदान केलं, देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का? असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गेंनी केली आहे.

खर्गेंच्या या वक्तव्याचा भाजपनं जोरदार निषेध करत हे वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी भाजपनं केली. यानंतर हे वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून वगळण्यात आलं.