www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बसपा खासदार धनंजय सिंह यांच्या शासकीय निवासस्थानात काम करणारी मोलकरीण रेखा हिचा मृत्यू झाल्यानंतर या घरात सुरू असलेले आणखीही काही कारनामे उघड झालेत. रेखाप्रमाणेच मीना हीदेखील धनंजयच्या पत्नी डॉ. जागृती हिच्या क्रूरतेची बळी ठरली होती. ‘जागृती नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक देते’ असा आरोप जागृतीवर करण्यात आलाय.
मारहाणी दरम्यान जीव गमावणाऱ्या मोलकरीण रेखाला वाचविण्यासाठी जेव्हा मीनामध्ये पडत असे, तेव्हा तिलाही जबरदस्त मारहाण होत असे. पाणावलेल्या डोळ्यांनी मीनाने सांगितले की ‘भाऊही (खासदार धनंजय सिंह) शांतपणे बघत असे. काही बोलत नसत’. मीनाच्या शरीरावर जखमाचे इतके घाव आहेत की, कोणालाही भीती वाटेल. तिचा उजवा हात फ्रॅक्चर आहे. जागृतीने खूपदा माचिसनं मीनाचे केस जाळले होते. अजूनही तिच्या डोक्यावरील अर्ध्या भागतील केस जळालेले आहेत.
उपचारासाठी आरएमएल रुग्नालयात भर्ती असणाऱ्या मीनानं ही तक्रार केलीय. ‘दीदी (जागृती) संध्याकाळी जेव्हा घरी येत असे तेव्हा माहित नाही का, पण संतापलेल्या अवस्थेत असत. तिच्यासमोर जो कोणी येत असे, खात्रीपूर्वक त्याची खैर नसे. दीदी काही ना काही कारण काढून मला, राखीला आणि अल्पवयीन नोकराला इतकी मारहाण करत असे की, खूप दिवस शरीरात वेदना होत असत. एखाद्या वेळी काही चूक झाली तर दीदी (जागृती) जेवणाच्या वेळी अचानक आमच्यात येत असे आणि कुत्रा बना आणि कुत्र्यासारखं हात न लावता तोंडाने थेट खा, असं सांगत असे. आम्ही रडलो किंवा नकार दिला तर असता दांड्यानं क्रूरतेने आम्हाला मारहाण केली जात असे’, असं मीनानं म्हटलंय.
तिच्या म्हणण्यानुसार धनंजय सिंहही कधी कधी त्यांना मारहाण करत होता. नवी दिल्ली जिल्हा पोलीस डीसीपी त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी जागृतीने गरम इस्त्री मीनाच्या पोटावर ठेवली होती. ज्याची जखम अद्यापही भरलेली नाही. मध्यंतरीच्या काळात मीनाच्या एका चुकीसाठी तिला अशा ठिकाणी गरम इस्त्रीचा चटका देण्यात आला, ज्यामुळे तिला उठायला आणि बसायला अजूनही त्रास होत आहे. डॉक्टरांच्या म्हण्यानुसार मीनाला उपचारासाठी बराच काळ रुग्णालयात राहावं लागणार आहे.
मीना आणि राखी या दोघीही २४ कोलकत्त्याच्या परगना भागातील आहेत. धनंजय सिंह आणि त्याची पत्नी जागृती यांना पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.