नवी दिल्ली: लोकसभा आणि राज्यसभेत आजही काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातलाय. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज पाण्यात जाण्य़ाची शक्यता आहे.
लोकसभेत काँग्रेसनं दिलेला व्यापम घोटाळ्यावरचा स्थगन प्रस्ताव आज लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला. त्यामुळं काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर कामकाज तासाभरासाठी तहकूब करण्यात आलंय.
राज्यसभेत मात्र आज मायावतींनी व्यापम घोटळ्यावर चर्चेची मागणी केली. तर काँग्रेस स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत होती. या गदारोळामुळं तीन वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं.
दरम्यान, राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.