गुजरात निवडणूक LIVE: भाजप महापालिकेत, काँग्रेस पंचायत समित्यात आघाडी

पटेल आरक्षणाच्या मागणीनंतर गुजरातमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांचे आज निकाल असून भाजपसाठी आज सत्वपरिक्षा आहे. आज मतमोजणी होत आहे. 

Updated: Dec 2, 2015, 12:48 PM IST
गुजरात निवडणूक LIVE:  भाजप महापालिकेत, काँग्रेस पंचायत समित्यात आघाडी title=

अहमदाबाद : पटेल आरक्षणाच्या मागणीनंतर गुजरातमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांचे आज निकाल असून भाजपसाठी आज सत्वपरिक्षा आहे. आज मतमोजणी होत आहे. 

लाइव्ह अपडेट 

१२.२० वाजता : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 
- राज्यातील २३० तालुका किंवा पंचायत समितीतील ४७७८ वॉर्डापैकी ९५० वॉर्डत भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस ८५० जागांवर आघाडी आहे. 
 

- ५६ नगर परिषदांच्या ५२४ वॉर्डांपैकी भाजपने ३७२ जागांवर आघाडी/विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने २९५ जागांवर आघाडी/विजय मिळवला आहे. तर ५७ जागांवर इतर आघाडीवर आहेत. 
 
- ३१ जिल्ह्यातील पंचायतीतील ९८८ वॉर्डांपैकी भाजपने १०६ जागांवर आघाडी/विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने १४३ जागांवर आघाडी/विजय मिळवला आहे. इतर ५ जागांवर आघाडी/विजय मिळवला आहे

 

सकाळी ११.३० वाजता : सुरूवातीच्या ट्रेंड्समध्ये भाजप

अहमदाबादमध्ये ४४ जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस ८

भावनगर : भाजप २२ जागा आघाडीवर, काँग्रेस १७ जागांवर आघाडीवर 

जामनगर - भाजप २८, काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर 

वडोदरा - भाजप १०, काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर 

सूरत - भाजप ५२ , काँग्रेस ३३ जागांवर आघाडीवर 

 

 

सकाळी ११ वाजता : भाजपची पुन्हा सहाच्या सहा महापालिकांमध्ये आघाडी घेतली.  

भाजपने पटेल आरक्षणासाठी लढणाऱ्या हार्दिक पटेलच्या वॉर्डात विजय मिळवला आहे. 

सकाळी १०.३५ : सूरतमध्ये भाजपाला आघाडी, ३३ जागांवर पुढे 

सूरतमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई 

काँग्रेसची भावनगरमध्ये आघाडी, काँग्रेस २० तर भाजप १४ जागांवर आघाडीवर 

राजकोटमध्ये भाजपला आघाडील १८ जागांवर पुढे

सकाळी १०.१५ : वडोदरा भाजप १७ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ७ 

सूरत काँग्रेस ३०, भाजप २० जागांवर आघाडीवर

सकाळी ९.५५  : मिनिटांपर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार काँग्रेसने सूरतमध्ये आघाडी घेतली आहे. तर राजकोटमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जबरदस्त चुरस सुरू आहे. तर भाजपने अहमदाबाद, वडोदरा, भावनगर आणि जामनगर येथे आघाडी घेतली आहे. 

गुजरातच्या सहा महापालिकांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. होते. तसेच ३१ जिल्हा परिषद आणि २३० पंचायत समित्या, ५६ नगरपालिकासाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. 

यातील सहा महापालिकांसाठी फक्त ४५ टक्के मतदान झाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.