आजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग

आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2016 पासून कार, सिगरेट, ब्रॅण्डेड गारमेंट्स महाग होणार आहेत.

Updated: Apr 1, 2016, 04:53 PM IST
आजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग title=

मुंबई: आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2016 पासून कार, सिगरेट, ब्रॅण्डेड गारमेंट्स महाग होणार आहेत. तर चप्पल, सोलार लॅम्प या गोष्टी स्वस्त होणार आहेत. 2016-17 च्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या टॅक्सच्या बदलांमुळे या गोष्टींच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. 

केंद्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये कृषी कल्याण सेस लावण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हॉटेलचं जेवणही महाग होणार आहे.

या गोष्टी होणार महाग

कार

सिगरेट, तंबाखू, बिडी, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ

हॉटेलमधलं जेवण, विमान प्रवास, ज्याचं बिल द्याव लागतं त्या सेवा

रेडीमेड कपडे, ब्रॅण्डेड कपडे ज्यांची किंमत एक हजार रुपयांपेक्षा जास्त आहे

सोनं आणि चांदी, चांदी सोडून ज्वेलरी

मिनरल वॉटर

अॅल्युमिनियम फॉईल

प्लॅस्टिक बॅग्स

आयात केलेली इमिटेशन ज्वेलरी

इंडस्ट्रियल सोलार वॉटर हिटर

कायदेशीर सेवा

लॉटरी तिकीट

 

या गोष्टी होणार स्वस्त

चप्पल, बूट

सोलार लॅम्प

राऊटर, ब्रॉडबॅन्ड मॉडेम, सेट टॉप बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेरा

60 स्केअर मीटर कारपेट एरियापेक्षा कमी असलेली घरं

पेन्शन प्लॅन

मायक्रोव्हेव ओव्हन

सॅनिटरी पॅड्स

ब्रेल पेपर