नवी दिल्ली : ३० डिसेंबरनंतरही बँक आणि एटीएममधून कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आणि नोटा छापणारी प्रिटींग प्रेस आवश्यक तितका पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरनंतर नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर स्थिती सामान्य होण्यासाठी ५० दिवसांचा वेळ मागितला होता. त्यानंतर सर्व बँकामध्ये लोकांची गर्दी पाहता ही स्थिती सामान्य होण्यासाठी काही अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेतील कामकाज स्थिर राहण्यासाठी नवीन वर्षातही कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहू शकते. सध्यास्थितीला एक व्यक्तीला एटीएममधून दिवसाला 2500 आणि खात्यातून आठवड्याला 24 हजार काढण्याची मर्यादा आहे. दिल्लीत नोटाबंदीप्रकरणी आज राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली.
देशभरात आंदोलनाची रणनिती या बैठकीत आखली जात आहे. तर दूसरीकडे अर्थमंत्री अरूण जेटलींनी विरोधकांवर टीका केली आहे. कॅशलेस इकॉनॉमी झाल्याने देश्यात कॅश नसेल या विरोधकांच्या प्रचारावर त्यांनी तोंडसुख घेतलं.