कोलकाता : पश्चिम बंगालचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लानं पश्चिम बंगालच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये लक्ष्मी रतन शुक्ला सगळ्यात तरुण मंत्री झाला आहे. शुक्ला हा पश्चिम बंगालच्या टीमचा कॅप्टन होता, तसंच त्यानं भारतासाठी तीन आंतरराष्ट्रीय मॅचही खेळल्या आहेत.
यंदाच्या रणजी मोसमाच्या सुरवातीला शुक्ला खेळला होता, पण त्यानं कॅप्टनशीप सोडली आणि त्यानंतर लगेच क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली. कॅब लीगमधून क्लब क्रिकेट खेळताना ममता बॅनर्जींनी शुक्लाला हावडामधून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. या निवडणुकीमध्ये त्याचा विजय झाला आणि आता तो मंत्री झाला आहे.