लालकृष्ण अडवाणींची ब्लॉगमधून राहुल, सोनियांवर टीका

दोषी आमदार-खासदारांबाबतच्या अध्यादेशावर राहुल गांधींची टीका आणि त्यानंतर सरकारनं अध्यादेश मागे घेणं यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मार्मिक शब्दांत भाष्य केले आहे. आपल्या ब्लॉगमधून सोनिया आणि राहुल गांधींना टार्गेट केलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 4, 2013, 06:49 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दोषी आमदार-खासदारांबाबतच्या अध्यादेशावर राहुल गांधींची टीका आणि त्यानंतर सरकारनं अध्यादेश मागे घेणं यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मार्मिक शब्दांत भाष्य केले आहे. आपल्या ब्लॉगमधून सोनिया आणि राहुल गांधींना टार्गेट केलं.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यामुळे हा अध्यादेश मागे घेतला गेला, राहुल मुळे नव्हे, असं त्यांनी म्हटलंय. तसंच राहुल यांच्यामार्फत डॅमेज कंट्रोल करताना त्यांना काय बोलायचं हे सांगितलं गेलं, कसं बोलायचं हे सांगितलं गेलं नाही, असं अडवाणींनी म्हटलंय... बघुयात अडवाणींनी ब्लॉगमध्ये काय लिहिलंय.
दोषी लोकप्रतिनिधींना वाचवणारा वटहुकूम मागे घेण्याचं सारं श्रेय राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचं आहे, राहुल गांधींचं नव्हे, असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधींना श्रेय देऊन काँग्रेस संधीसाधूपणा करत असल्याची टीकाही अडवाणींनी आपल्या ब्लॉगमधून केली आहे. वटहुकूम मागे घेतल्याने यूपीएच्या काळातील आणखी एक काळा अध्याय संपल्याचं अडवणींनी म्हटलं आहे.
मात्र मीडियाने सारं श्रेय राहुल गांधींना दिल्याचं म्हणत अडवाणींनी नाराजी व्यक्त केली आहे. अडवाणींने आपल्या ब्लॉगमध्ये थेट सोनिया गांधींना लक्ष्य केलं आहे. सोनियांना माहीत होतं की राष्ट्रपती अध्यादेश संमत करणार नाहीत. त्यामुळे सरकारचा बचाव करण्यासाठी त्यांनी राहुल गांधींना पुढे केलं, असं अडवाणी म्हणाले.
राहुल गांधींना पुढे केलं. मात्र, पुढे काय करायचं आणि कसं करायचं हे त्यांना कोणीच सांगितलं नाही. त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारची मान शरमेने झुकली.
दरम्यान, कलंकित नेत्यांना निवडणूक लढवण्याबाबतचा वटहुकूम सरकारनं मागे घेतला. मात्र आता त्यावरुन श्रेयाचा वाद सुरु झाला आहे. राष्ट्रपतींच्या भूमिकेमुळे वटहुकूम सरकारनं मागे घेतल्याचं भाजपनं म्हटलंय. तर काँग्रेसनं याचं श्रेय राहुल गांधींना दिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.