नवी दिल्ली : रेल नीर घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उत्तर रेल्वेच्या दोन माजी अधिकारी आणि सात संबंधित कंपनीविरोधात १३ ठिकाणी छापा मारला. या छाप्यात २० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.
प्रीमिअम रेल्वेत रेल नीर ऐवजी दुसऱ्याच कंपनीचे पाणी पुरवठा प्रवाशांना करण्यात येत आहेत. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता. यासंबधित हे सीबीआयने छापे मारलेत. दरम्यान, दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहीती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेय.
रेल्वेत अनिवार्य करण्यात आलेल्या रेल नीर ऐवजी दुसरेच निकृष्ट दर्जाचे बाटलीबंद पाणी पुरवठा करण्यात येत होते. तसेच रेल नीर बाटलीमागे सुमारे १०.५० रुपये दराने विक्री करण्यात यावी आणि महत्वाच्या गाड्यांमध्ये पुरवठादारांनी ते १५ रुपयांनी विक्री करावे, असे ठरले होते.
Last night two officer raided by CBI have been suspended, MR @sureshpprabhu Zero tolerance to corruption. @PIB_India @MIB_India
— Ministry of Railways (@RailMinIndia) October 17, 2015
मात्र, ठेकेदारांनी निकृष्ठ बाटलीबंद पाणी ५.७० रुपयांनी खरेदी करुन ते चढ्या दराने विक्री करण्यात येत होते. त्यामुळे रेल्वेला फायदा होत नव्हता. रेल्वेचे रेल नीर पडून होते. त्यामुळे संशय आल्यानंतर या भ्रष्टाचार होत असल्याचे पुढे आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.