बिहारमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर

बिहारमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येत आहे. पश्चिशम चंपारण जिल्ह्यातील केसरीयानजीकच्या जानकीनगरमध्ये महावीर मंदिर ट्रस्टतर्फे हे विराट रामायण मंदिर उभारण्यात येणार आहे. दरम्यान, हिंदू राजा सूर्यवर्मन राजवटीतील `अंग्कोर वॅट` हे मंदिर सध्या युनेस्को जागतीक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 3, 2013, 12:15 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, पाटणा
बिहारमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येत आहे. पश्चिशम चंपारण जिल्ह्यातील केसरीयानजीकच्या जानकीनगरमध्ये महावीर मंदिर ट्रस्टतर्फे हे विराट रामायण मंदिर उभारण्यात येणार आहे. दरम्यान, हिंदू राजा सूर्यवर्मन राजवटीतील `अंग्कोर वॅट` हे मंदिर सध्या युनेस्को जागतीक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
या मंदिराची उंची ४०५ फूट असून मंदिरात २० हजार लोक बसू शकतील एवढा मोठा सभामंडप आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बिहारमध्ये उभारण्यात येत आहे. दुर्गापूजेनंतर या मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी दिली आहे.
बाराव्या शतकातील जगप्रसिद्ध अंग्कोर वॅट मंदिरापेक्षा याची उंची दुप्पट असेल. कंबोडियातील या मंदिराची उंची २१५ फूट आहे. पाटण्यापासून सुमारे १२५ किमी अंतरावरील याच संकुलात उंच कळस असलेली १८ मंदिरे असतील. तसेच यातील शिवमंदिरातील शिवलिंग हे जगातील सर्वात मोठे शिवलिंग असणार आहे. एकूण १९० एकर जमिनीवर उभारण्यात येणार्याग या संकुलातील मुख्य मंदिरात राम, सीता, लव व कुश यांच्या मूर्ती असतील. तर याच्या गाभार्यारसमोर विस्तीर्ण सभामंडप असेल. यासाठी सुमारे ५००कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सर्वसामान्यांनी दिलेल्या दानातून हे मंदिर उभारण्यात येणार आहे. या भव्य मंदिराचे नाव आधी `विराट अंग्कोर वॅट राम मंदिर` असे ठरविण्यात आले होते. पण कंबोडियातील काही लोकांनी त्यास आक्षेप घेतल्याने ते बदलून `विराट रामायण मंदिर` असे करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.