धारवाडच्या वीरयोद्ध्याच्या या पाच गोष्टी जाणून घ्याच...

जगातली सर्वोच्च उंचीवरची युद्धभूमी सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात २५ फूट बर्फाखाली गाडले गेलेले लान्सनायक हणमंतप्पा कोप्पड तब्बल ६ दिवसानंतरही जिवंत सापडले... आणि 

Updated: Feb 11, 2016, 04:19 PM IST
धारवाडच्या वीरयोद्ध्याच्या या पाच गोष्टी जाणून घ्याच...  title=

मुंबई : जगातली सर्वोच्च उंचीवरची युद्धभूमी सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात २५ फूट बर्फाखाली गाडले गेलेले लान्सनायक हणमंतप्पा कोप्पड तब्बल ६ दिवसानंतरही जिवंत सापडले... आणि अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण, अखेर आज सकाळी हणमंतप्पांची प्राणज्योत मालवली. दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

 

याच वीरयोद्ध्याच्या या काही उल्लेखनीय गोष्टी...

- कर्नाटकातील धारवाडच्या एका लहानश्या खेड्यात हणमंतप्पा लहानाचे मोठे झाले. आपल्या शाळेत पोहचण्यासाठी त्यांना दररोज तब्बल ६ किलोमीटर पायपीट करावी लागत होती. 

- हणमंतप्पा यांचं लष्करात सामील होण्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं... यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. त्यांचे हे प्रयत्न तीन वेळा अयशस्वी झाले होते. पण, हार न मानता त्यांनी चौथ्यांदा मात्र लष्करात प्रवेश मिळवलाच. त्यांना मद्रास रेजिमेन्टमध्ये सहभागी करण्यात आलं. 

- मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदरच त्यांनी घरी फोन करून सर्वांची चौकशी केली होती... घरी सगळं कसं आहे? असं विचारलं होतं. हणमंतप्पा आपल्या घरात मोठ्या मुलाची भूमिका निभावत होते. 

-  कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील बेतादूरा गावात हणमंतप्पा यांचं कुटुंब राहतं 

- चार वर्षांपूर्वीच हणमंतप्पा यांचा विवाह महादेवी यांच्याशी झाला होता. त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे.