'कोंबडा पळाला लंडन'ला आताच का होतंय व्हायरल?

जॅकपॉट चित्रपटातील हे आयटम नंबर साँग आहे, हे गाणं गायक आनंद शिंदे....

Updated: Mar 10, 2016, 02:01 PM IST

मुंबई : जॅकपॉट चित्रपटातील हे आयटम नंबर साँग आहे, हे गाणं गायक आनंद शिंदे यांनी गायलंय. या गाण्याचा मेकिंग साँगचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर सध्या व्हायरल होतोय़य यू-ट्यूबवर तुम्ही जॅकपॉट कोंबडा पळाला लंडनला असं टाकल्यावरही तुम्हाला हे गाणं ऐकता येणार आहे. 

हे गाणं काही महिन्यांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आलंय, पण जेव्हापासून विजय मल्ल्या देशसोडून लंडनला गेल्याची बातमी आलीय, तेव्हापासून हे गाणं जास्त व्हायरल होतं आहे. 

भारत देशात नियमित कर्ज भरणाऱ्यांमध्ये शेतकरी आघाडीवर आहेत, तर काही उद्योजकांनी मात्र लाखो शेतकऱ्यांच्या वाटेचं कर्ज घेऊन, राष्ट्रीयकृत बँकांना देशोधडीला लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत, तर तेव्हा ऐका....म्हटलंय या गाण्यात.. कोंबडा पळाला लंडनला...