www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
किन्नर समाजाला आता त्यांची स्वतःची ओळख मिळाली आहे. मतदार यादीमध्ये प्रथमच स्त्री किंवा पुरुष नाही तर ` किन्नर` या नावाने त्यांची वेगळी नोंद करण्यात आली आहे. यामुळे किन्नर समाजात आनंदाचे वातावरण पसरलंय.
मतदार यादी तयार करताना फॉर्म सहा भरावा लागतो. पण याआधी यात केवळ स्त्री व पुरूष असे दोनच स्तंभ अस्तित्वात होते. त्यात 'तृतीयपंथीय' असा वेगळा स्तंभ असावा, अशी मागणी या समाजानं केली होती. आता, हा स्तंभ अस्तित्वात आल्यानं आता आपल्याला समाजानं स्वीकारलंय, या भावनेनं किन्नर समाज सुखावलाय.
या संदर्भात किन्नर समाजातल्या प्रतिनिधींशी केलेली ही बातचीत...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.