हिंदू-मुस्लिमांनी गो-मांस खाऊन केला बंदीचा विरोध

महाराष्ट्रात गो-वंश हत्या बंदीच्या विरोधात केरळमध्ये एका खुल्या ठिकाणी बीफ (गायचं मांस) शिजविण्यात आले. इतकेच नाही तर हे मांस हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र बसून खाल्याचे सांगण्यात येत आहे. या फूड फेस्टमध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रात गो-हत्या बंदीला विरोध केला. 

Updated: Mar 11, 2015, 07:38 PM IST
हिंदू-मुस्लिमांनी गो-मांस खाऊन केला बंदीचा विरोध title=

तिरूवनंतपुरम : महाराष्ट्रात गो-वंश हत्या बंदीच्या विरोधात केरळमध्ये एका खुल्या ठिकाणी बीफ (गायचं मांस) शिजविण्यात आले. इतकेच नाही तर हे मांस हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र बसून खाल्याचे सांगण्यात येत आहे. या फूड फेस्टमध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रात गो-हत्या बंदीला विरोध केला. 

केरळमध्ये बीफ म्हणजे गाय आणि म्हशीचे मांस खाल्ले जाते. बीफ खाणे कोणत्याही धर्माशी जोडलेले नाही. केरळमध्ये अनेक हिंदू आहेत की जे बीफ खातात. हे येथील लोकांचे आवडीचे मासं आहे. 

या संदर्भात सीपीएम युथ विंगचे अजीत पी. ने सांगितले, 'मी एक हिंदू आहे, मी बीफ खातो. मला माझ्या आवडीच्या गोष्टी खाण्याचे स्वातंत्र मिळाले पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी मी इथे विरोध करायला आलो आहे. अजित यांनी आपली डिश मुहम्मद याच्यासोबत शेअर करत होता. मुहम्मद याने सांगितले, आम्हांला बीफ खाण्याची कोणतीच समस्या नाही. हे केरळचे कल्चर आहे. आम्हांला काही खाण्याची इच्छा असेल तर कोणी रोखू शकत नाही. 

बीफ करी खातांना सीपीएमचे आमदार पी. श्रीरामकृष्णन यांनी सांगितले, की मी बीफ खाणार आणि केरळचे बहुतांशी लोकही खाणार, बंदीमुळे काही बदलणार नाही. मागील आठवड्यात महाराष्ट्र सरकारने गो-मांसची विक्री आणि व्यापारावर बंदी घातली आहे. बीफ खातांना किंवा विकतांना सापडला त्याल पाच वर्षांचा तुरूंगवास आणि १० हजार रुपये दंड ठोठवण्यात येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.