केजरीवालांनी भांडी घासून घेतले प्रायश्चित

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यातून शीख जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल आज भांडी घासून प्रायश्चित घेतले. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर सुवर्णमंदिराचे छायाचित्र छापून त्यावर झाडू हे निवडणूक चिन्ह छापण्यात आले होते. तसेच पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी जाहीरनाम्याची तुलना गुरूग्रंथसाहेबशी केली होती.

Updated: Jul 18, 2016, 12:59 PM IST
केजरीवालांनी भांडी घासून घेतले प्रायश्चित title=

चंदिगढ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यातून शीख जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल आज भांडी घासून प्रायश्चित घेतले. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर सुवर्णमंदिराचे छायाचित्र छापून त्यावर झाडू हे निवडणूक चिन्ह छापण्यात आले होते. तसेच पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी जाहीरनाम्याची तुलना गुरूग्रंथसाहेबशी केली होती.

निवडणुकीत ‘आप’ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप, अकाली दल आणि कॉंग्रेस यांनी या मुद्दयावरून केजरीवाल यांना लक्ष्य केले. तसेच यामुळे पंजाबी जनतेमध्येही पक्षाची प्रतिमा खराब झाली.
यावर उपाय म्हणून अमृतसर येथील सुवर्ण मंदीर आणि हरमिंदर साहेब येथे आज पहाटे केजरीवाल आणि आशिष खेतान यांनी भांडी घासून आणि भाविकांची सेवा करून जनतेची माफी मागितली.