फक्त, १९३३ रुपयांत देशभर कुठेही विमानानं करा प्रवास

जेट एअरवेजनं प्रवाशांना आपल्याकडे वळवण्याासाठी पुन्हा एकदा एक नवीन ऑफर दिलीय.... अत्यंत कमी दरात देशभरात कुठेही प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना यामध्ये मिळणार आहे. 

Updated: Mar 13, 2015, 01:46 PM IST
फक्त, १९३३ रुपयांत देशभर कुठेही विमानानं करा प्रवास  title=

नवी दिल्ली : जेट एअरवेजनं प्रवाशांना आपल्याकडे वळवण्याासाठी पुन्हा एकदा एक नवीन ऑफर दिलीय.... अत्यंत कमी दरात देशभरात कुठेही प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना यामध्ये मिळणार आहे. 

या ऑफरमध्ये, प्रवाशांना यात्रेच्या ९० दिवसांपूर्वी विमानांच्या तिकिटांचं बुकिंग करावं लागणार आहे. यावेळी, जेट एअरवेजनं आपल्या डिस्काऊंटेड एअर तिकीट स्कीमला '९० डेज अॅडव्हान्स पर्चेस फेअर्स' असं नाव दिलंय. 

या ऑफरमध्ये प्रवाशांना केवळ १९३३ रुपयांचं भाडं देऊन जेट एअरवेजचं इकोनॉमी क्लासमध्ये देशभरात कुठेही प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना प्रवासाच्या ९० दिवसाअगोदर तिकीट बुक करावं लागणार आहे. 

मात्र कंपनीच्या वेबसाईटनुसार, डिस्काऊंटच्या तिकिटांचा लाभ लहान मुलांना मिळणार नाही. प्रवाशांनी आपल्या प्रवासाची तारीख आणि फ्लाईट बदलली तर त्याला अधिक २ हजार रुपये भरावे लागतील. एकदा तिकीट घेतल्यानंतर रद्द केल्यास त्याचे पैसे परत मिळणार नाहीत.   
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.