जेट एअरवेजचं विमान दुर्घटनाग्रस्त, सर्व प्रवासी सुखरूप

दिल्लीहून खजुराहो येथे जाणारं जेट एअरवेजचं विमान 9W2423 हे विमान लॅंडिग करते वेळी अपघातग्रस्त होता होता वाचलं. लॅंडिग करतांना विमानाचं एक चाक जमिनीला आदळून वेगळं झालं. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानातील सर्व प्रवासी घाबरले. 

Updated: Apr 13, 2015, 07:59 PM IST
जेट एअरवेजचं विमान दुर्घटनाग्रस्त, सर्व प्रवासी सुखरूप title=
खजुराहो : दिल्लीहून खजुराहो येथे जाणारं जेट एअरवेजचं विमान 9W2423 हे विमान लॅंडिग करते वेळी अपघातग्रस्त होता होता वाचलं. लॅंडिग करतांना विमानाचं एक चाक जमिनीला आदळून वेगळं झालं. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानातील सर्व प्रवासी घाबरले. 
 
विमानाचं चाक निघूनसुद्धा विमान सुखरूप जमिनीवर उतरलं आणि सर्व प्रवाशांना एमर्जन्सी दरवाजाने बाहेर काढण्यात आले. खजुराहो विमानतळ व्यवस्थापनाने या घटनेचा खुलासा केला. १.३५ वाजता ही घटना घडली. विमानतळ व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. याआधी शनिवारी रात्री जेट आणि एअर इंडियाच्या विमानांना खराब हवामानाचा फटका बसला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.