नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. यात चकमकीत लश्कर ए तैयबाचे दोन अतिरेकी मारण्यात यश आले.
पुलवामा परिसरात अतिरेकी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय जवानांनी गुरसू परिसराला घेरले. जवानांनी घर घराची तलाशी घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुद गोळीबार केला. मात्र, जवानांनी शरण येण्यासाठी हत्यार खाली टाकण्याचे आवाहन केले. परंतु त्यांनी गोळीबार केला. जवानांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेलेत.
दहशतवाद्यांचे शव आज सकाळी ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही विदेशी असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आली. हे दोघेही लश्कर ए तैयबाचे असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून दोन एके रायफल जप्त करण्यात आली आहे.