जम्मू-काश्मीर : सांगलीच्या ७१ कुटुंबांचा अजून संपर्क नाही

सांगलीतील २५० कारागीर जम्मू-काश्मीरच्या पुरात अडकले आहेत. हे कारागीर सोन्याच्या उद्योगात काम करतात, त्यांच्या  ७१  कुटुंबांचा  संपर्क  होत  नाहीय. 

Updated: Sep 11, 2014, 08:54 PM IST
जम्मू-काश्मीर : सांगलीच्या ७१ कुटुंबांचा अजून संपर्क नाही title=

सांगली : सांगलीतील २५० कारागीर जम्मू-काश्मीरच्या पुरात अडकले आहेत. हे कारागीर सोन्याच्या उद्योगात काम करतात, त्यांच्या  ७१  कुटुंबांचा  संपर्क  होत  नाहीय. 

सोनं साच्यात ओतण्याचं काम करणाऱ्या या कारागीरांची नावं आणि फोन नंबर यादी नातेवाईकांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोपवली आहे. तसेच श्रीनगर मधील 'कुकर बाजार' भागातील एका इमारतीवर १५ जण अडकून  बसले  आहेत. 

या बाबत  सांगली  जिल्हा  प्रशासनाने, जम्मू  प्रशासनाशी संपर्क साधला असून, या लोकांचा शोध घेण्याच काम सुरु आहे.

सांगली  जिल्ह्यातील विटा आणि  खानापूर  भागात  गलाई  काम  मोठ्या प्रमाणात चालते. १९७ २ च्या भीषण दुष्काळाच्या वेळी येथील शेकडो लोक स्थलांतरीत झाले. रोजगारासाठी इथले लोक हे गलाई कामासाठी (सोन्या-चांदीचे कारागीर)  देशभर विखुरले गेले.

पूर स्थितीमुळे जम्मू आणि काश्मीर मध्ये गलाई कामासाठी मध्ये गेलेल्या ७१  कुटुंबांचा संपर्क  होत  नाही. या कुटुंबातील  जवळ  पास २५० गलाई  कारागीर  हे या ठिकाणी  अडकून  पडलेले  आहेत. 

या  पैकी  १५  जणांचा संपर्क झाला असून, हे १५ जण 'कुकर बाजार' भागातील एका इमारतीवर अडकले आहेत.  सांगली  जिल्हा  प्रशासनाने, जम्मू  प्रशासनाशी संपर्क साधला असून, या लोकांचा शोध घेण्याच काम सुरु आहे. सांगली  जिल्हा  प्रशासनाने हेल्पलाइन सुरु केली असून, या बाबत माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.