मंगळयानाने काढले पृथ्वीचे छायाचित्र

भारताची मंगळयान मोहीम यशस्वी झाली आहे. या यशस्वी मोहिमेनंतर प्रथमच मंगळयानाने आपला पहिले छायाचित्र पाठविले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मंगळयानाने पाठविलेला फोटो इस्रोने प्रसिद्ध केला आहे. हे छायाचित्र फेसबुकवर अप करण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2013, 07:40 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताची मंगळयान मोहीम यशस्वी झाली आहे. या यशस्वी मोहिमेनंतर प्रथमच मंगळयानाने आपला पहिले छायाचित्र पाठविले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मंगळयानाने पाठविलेला फोटो इस्रोने प्रसिद्ध केला आहे. पृथ्वीचे हे छायाचित्र फेसबुकवर अप करण्यात आले आहे.
मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारताने मंगळयान मोहीम हाती घेतली. मंगळयानावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याचं टेस्टिंग करण्यासाठी सर्वप्रथम पृथ्वीचे काही फोटो काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळयानाने काढलेला पृथ्वीचा फोटो हा त्याचाच भाग आहे.
मार्स कलर कॅमेऱ्याने काढलेला पहिला फोटो इस्रोने आज त्यांच्या फेसबुक पेजवर आणि वेबसाईटवर अप केला आहे. बुधवारी पृथ्वीपासून तब्बल ७० हजार किलोमीटरवरून हा फोटो घेण्यात आला आहे. या मंगळयानाच्या कॅमेऱ्याने काढलेला या फोटोमुळे मंगळाचे फोटोही अतिशय सुस्पष्ट येतील, असा विश्वास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.