जीएसएलव्ही डी ५चं प्रक्षेपण पुढे ढकललं!

जीएसएलव्ही डी ५चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलंय. ४ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून हे प्रक्षेपण होणार होतं. मात्र तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपण पुढे ढकलल्याचा इस्रोनं जाहीर केलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 19, 2013, 05:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, श्रीहरीकोटा
जीएसएलव्ही डी ५चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलंय. ४ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून हे प्रक्षेपण होणार होतं. मात्र तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपण पुढे ढकलल्याचा इस्रोनं जाहीर केलंय. प्रक्षेपणाची पुढली तारीख नंतर जाहीर केली जाईल, असंही इस्रोचे संचालक के. राधाकृष्णन यांनी म्हटलंय.
यामुळे जीसॅट-१४ या उपग्रहाचं प्रक्षेपणही लांबलंय. जीएसएलव्हीमध्ये देशी बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आल्यानंतर दोन वेळा त्याचं उड्डाण अयशस्वी ठरलंय. आता पुन्हा एकदा उड्डाण पुढे ढकलण्याचा कटू निर्णय इस्रोला घ्यावा लागलाय.
सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर अवकाशात भरारी घेण्यासाठी ‘जीएसएलव्ही डी-५’ सज्ज झालं होतं. जीएसएलव्ही-डी-५ प्रक्षेपकाद्वारं दूरसंचार उपग्रह असलेला जीएसएटी (जीसॅट)-14 अवकाशात सोडला जाणार आहे. या मोहिमेत प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या जीएसटी-१४ या उपग्रहाचं वजन एक हजार नऊशे ब्याऐंशी किलो इतकं आहे. उपग्रह दूरसंचारासाठी वापरण्यात येणार आहे.
हा उपग्रह अवकाश सोडण्यासाठी वापण्यात येणाऱ्या जीएसएलव्ही प्रक्षेपकात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आलाय. याआधी १५ एप्रिल २०१० रोजी जीएसएलव्ही-डी-३ या प्रक्षेपकात भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आला होता. मात्र हा प्रयोग अयशस्वी ठरला होता.
त्यानंतर डिसेंबर २०१०मध्ये रशियाकडून मागवलेल्या क्रायोजेनिक इंजिनचा उपयोग करण्यात आला. मात्र तोही असफल ठरला. अखेर या सगळ्यांवर मात करुन आज जीएसएलव्ही- डी-५ अवकाशात झेपावणार असल्यानं भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोसाठी हे उड्डाण प्रतिष्ठेचं आहे. ही झेप यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन, रशिया आणि फ्रान्सच्या बरोबरीनं अवकाशात भारताला मानाचं स्थान मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.