वादग्रस्त वक्तव्यामुळे खासदार परेश रावल चर्चेत

भाजपा खासदार आणि प्रख्यात अभिनेते परेश रावल वादात अडकलेत.

Updated: May 23, 2017, 08:42 AM IST
वादग्रस्त वक्तव्यामुळे खासदार परेश रावल चर्चेत  title=

मुंबई : भाजपा खासदार आणि प्रख्यात अभिनेते परेश रावल वादात अडकलेत.

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या व्यक्तीऐवजी लेखिका अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवं होतं, असं ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय.

काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमध्ये निवडणुकी दरम्यान एका तरुणाला लष्करानं जीपला बांधलं होतं. हा वादग्रस्त व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर रावल यांनी हे ट्विट केलंय. त्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी जोरदार शेरेबाजी बघायला मिळतेय.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी रावल यांच्यावर टीका केली असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मात्र अंग काढून घेणंच पसंत केलंय.