मध्यप्रदेशात बनणार 'चालतंफिरतं' पोलीस स्टेशन

हायवेवरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी मध्यप्रदेशात चालतंफिरतं पोलीस स्टेशन तयार करण्यात येत आहेत. या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हायवेवर होणाऱ्या चोऱ्या, लूटमारी, अपघातांच्या घटनास्थळी पोलीस त्वरीत पोहचू शकणार आहेत.

Updated: Dec 11, 2016, 03:01 PM IST
मध्यप्रदेशात बनणार 'चालतंफिरतं' पोलीस स्टेशन title=

इंदूर : हायवेवरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी मध्यप्रदेशात चालतंफिरतं पोलीस स्टेशन तयार करण्यात येत आहेत. या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हायवेवर होणाऱ्या चोऱ्या, लूटमारी, अपघातांच्या घटनास्थळी पोलीस त्वरीत पोहचू शकणार आहेत.

मध्य प्रदेशात १२३ ठिकाणी अशाप्रकारचे पोलीस स्टेशन तयार येणार आहेत. त्यासाठी ३७ जागांची निवड करण्यात आलीये. २० जागांवर पोलीस स्टेशन तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अलीराजपूर बैतूल, सिवनी, टीकमगड, सागर, रेवा, जबलपूर, अनूपपूर, नीमच, अशोक नगर, पन्ना, मंडाला, सीधी, सिहोर, उमरिया, खांडवा आणि इंदूर या जिल्ह्यांत पोलीस स्टेशन तयार करण्याचे काम सुरू आहे.

या पोलीस स्टेशनची रचना सामान्य पोलीस स्टेशनपेक्षा वेगळी असणार आहे. त्याची बनावट स्टील आणि फॅब्रिकेटेड मटेरियलची असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतील.