श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा एकदा लाईन ऑफ कंट्रोलवर सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. कश्मीरमधील नोगाममध्ये दानेश आणि लक्ष्मी पोस्टवर पाकिस्तानी लष्कराकडून फायरिंग करण्यात आली. भारताने ही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. सकाळीपर्यंत ही फायरिंग सुरु होती अशी माहिती मिळाली आहे.
बुधवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीरमधील पुंछमध्ये आधी सीजफायरचं उल्लंघन केलं. भारतीय लष्कराने देखील त्याच्याविरोधात फायरिंग केली. उरी हल्ल्याच्या २ दिवसानंतर ही म्हणजेच २० सप्टेंबरला देखील पाकिस्तानने सीजफायरचं उल्लंघन केलं होतं. याआधी २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला ही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे.
बुधवारी रात्री भारतीय लष्कराचं सर्जिकल ऑपरेशन केलं. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना ठार केल्याची देखील माहिती मिळत आहे.
ऑर्मीचं डीजीएमओ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे की, आम्हाला काल माहिती मिळाली होती की, काही दहशतवादी हे सीमाभागातून घुसखोरी करणार आहेत. आम्ही सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर दहशदवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांना ठार केलं आहे.
ऑर्मीचे डीजीएमओ यांनी म्हटलं की, हा आमच्यासाठी खूप गंभीर विषय आहे. मागील काही दिवसांपासून आपल्या सीमा भागांमध्ये घुसखोरीचा प्रयत्न वाढला आहे. २० वेळा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. या दरम्यान मिळालेल्या वस्तू सांगतात की त्या पाकिस्तानातील आहेत. आम्ही काही दहशतवाद्यांना देखील पकडलं आहे जे पाकिस्तानचे आहेत. चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. आम्ही हा मुद्दा पाकिस्तान आणि जगासमोर ठेवला आहे.
जे दहशतवादी पुंछ येथे मारले गेले त्यांचे फिंगर प्रिंट देखील पाकिस्तानला देणार असल्याचं बोललं गेलं. पाकिस्तानच्या त्यांच्या धरतीचा वापर भारताविरोधात वापरु नये. पाकिस्तानने जानेवारी 2004 मध्ये आश्वासन दिलं होतं की, पाकिस्तान भारताविरोधात त्यांच्या धरतीचा वापर नाही करु देणार. काल अशी माहिती मिळाली होती की काही दहशतवादी एकत्र आले आहेत आणि घुसखोरी करुन भारतात हल्ले करणार आहे.
ही बातमी मिळताच भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक अॅक्शन घेण्याचा निर्णय घेतला. दहशतवाद्यांना ठार करणं हा आमचा मुख्य प्रयत्न होता. या प्रयत्नात दहशतवादी आणि त्यांचे काही लोकं मारली गेली असल्याची माहिती देथील डीजीएमओ यांनी दिली. आम्ही कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार आहोत. कोणत्याही परिस्थितीत घुसखोरी करु दिली जाणार नाही. देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही हवं ते पाऊल उचलणार असं देखील त्यांनी म्हटलं.