नवी दिल्ली : दक्षिण कश्मीरमधील त्राल भागात बुरहान वानीच्या गावात एका टॉवरवर पाकिस्तानचा झेंडा लावला गेला होता. पाकिस्तानच्या झेंड्याला उतरवण्यासाठी भारतीय सैनिकाने जीवाची परवाह न करता त्या मोबाईल टॉवरवर चढला.
व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी
पाकिस्तानच्या झेंड्याला उतरवत त्याने त्याजागी भारताचा तिरंगा लावला. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमऱ्य़ामध्ये कैद झाली. रविवारी पाकिस्तानचा हा झेंडा त्या मोबाईल टॉवरवर लावण्यात आला होता. हे पाहून एका जवानाने त्याच्या कमांडिंग अधिकाऱ्याची परवानगी घेऊन टॉवरवर चढला आणि तेथे तिरंगा लावला. १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वतंत्र दिवस असतो. रविवारी अनेक ठिकाणी काश्मिरात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात आले होते.