मुंबई : देशभरात आज ६८ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त 'डूडल'द्वारे अभिवादन करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सोशल मीडियावरही दिसत आहे. गूगल डूडल, फेसबूक, ट्विटर अशा अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांच्या विविध पोस्ट्स दिसत आहेत.
गूगलने तर 'प्रजासत्ताक दिना'चे औचित्य साधत खास डूडल तयार करत शुभेच्छा दिल्या आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आले होते. तोच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.