नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ज्यांच्याकडे आरक्षण श्रेणीतील तिकीट नसेल आणि तिकिट खिडकीवर रांगा, यामुळे रेल्वेचे तिकिट मिळत नाही. आता त्याची चिंता मिटणार आहे. रेल्वे अनारक्षित श्रेणीत तिकिट मिळण्यासाठी रेल्वे एक मोबाईल अॅपचा वापर करणार आहे.
रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, बुधवारी मोबाईल आधारित पेपरलेस अनारक्षित टिकटिंग एप्लिकेशन सुरु करणार आहोत. अॅपचा वापर करुन तिकिट बुक करु शकता. तसेच तिकिटाची प्रिंट आवश्यक नाही. तर तिकिटाची सॉफ्टकॉपी आपल्या स्मार्टफोन, मोबाईलवर दाखवू शकता.
पेपरलेस टिकटिंग प्रणाली रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचविल. तिकीट खिडकीवर रांग लावायची आता गजर लागणार नाही. हे अॅप एंड्राईडट आधारित मोबाईल फोनवर गूगल अॅपस्टोरच्या माध्यमातून हे अॅप डाऊनलोड करु शकता. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला रेल्वे ई-वालेट होण्यासाठी एक नोंदणीकृत आयडी मिळेल.
या अधिकाऱ्यांने सांगितले, प्रवाशांना ई-वालेट टॉपअप करण्यासाठी तिकिट खिडकीवर पर्याय उपलब्ध असेल. तसेच रेल्वेच्या संकेत स्थळावर क्रेडीट या डेबिट कार्डचा उपयोग करु शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.