www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जागतिक बाजारात भारताची पत पुन्हा सुधारावयाची असेल तर कोणाच्याही दबावाखाली न येता सरकारने आर्थिक धोरणे आहे तशीच राबविली पाहिजेत, असे मत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. रूपयाचा होणारे अवमूल्यन आणि घसरलेली पत यावर त्यांनी भारताच्या धोरणावर टीका केली.
भारताची आर्थिक स्थिती सातत्याने ढासळत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक स्थिती खालावल्याने देशाने जगाचा विश्वास गमावला आहे, ही बाब सरकारच्या लक्षातही येत नाही, अशी टीका रतन टाटा यांनी सरकारवर केली.
केंद्र सरकार खासगी क्षेत्रातील उद्योगांच्या दबावाखाली काम करत आहे. त्यांना खूश करण्यासाठी अनेक धोरणे ही `त्यांच्या` सोयीनुसार बदलली जातात. उशिरा राबविली जातात आणि काही वेळा त्यात फेरफारही केला जातो, असा हल्लाबोल टाटा यांनी केंद्रावर केलाय.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाची मान मागे एकदा उंचावली होती; गेल्या काही काळात ती खाली गेली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पंतप्रधानांच्या नेतृत्वावरील आपला विश्वास कायम असल्याचे सांगत टाटा म्हणाले.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल रतन टाटा म्हणाले, मोदींनी आपले नेतृत्व सिद्ध केलंल. गुजरातला देशातील महत्त्वाच्या राज्याचा दर्जा मिळाला आहे. मात्र, ते राष्ट्रीय पातळीवर काय शकतील याचा अंदाज मला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.