आयसीएसई आणि आयएससी निकालाच्या तारखा जाहीर

 'सीआयएससीई'कडून 'आयसीएससी'च्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेचा निकाल १८ मे २०१५ रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी जाहीर करण्यात येणार आहे. www.cisce.org या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

Updated: May 15, 2015, 07:46 PM IST
आयसीएसई आणि आयएससी निकालाच्या तारखा जाहीर title=

नवी दिल्ली : 'कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट  एक्झामिनेशन'तर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयएससीई)  आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल १८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

दोन्ही परीक्षांचे निकाल  १८ मे रोजी  दिवशी दुपारी साडे अकराच्यानंतर www.ExamResults.net आणि http://CISCE.ExamResults.net/ या वेबसाइटवर जाहीर करण्यात येतील. 

तसेच विद्यार्थी www.examresults.net वर आपली नोंदणी करून आपला निकाल आपल्या मेल आयडीवर मागवू शकतात. 

कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट  एक्झामिनेशन तर्फे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी स्कूल (आयसीएसई) आणि इंडियन स्कूल सर्टीफिकेट (आयएसई) परीक्षा घेतली जाते. 

गेल्या वर्षी सीआयसीएसईच्या आयसीएसईचा निकाल ९८.२८ टक्के लागला होता. तर आयएससीचा निकाल ९५.२७ टक्के लागला होता. यावर्षी आयसीएसईचा २६ फेब्रुवारी ते ३० मार्च २०१५ पर्यंत घेण्यात आली. आयएससीची परीक्षा ९ फेब्रुवारी ते १ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.