नेमकी कशी झाली होती याकूब मेमनला अटक...

सुप्रीम कोर्टानं १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याकूबनंतर याकूबला सुरक्षा यंत्रणांना पकडलं होतं की त्यानं आत्मसमर्पण केलं होतं? यावरून बराच वाद रंगला... हाच वाद याकूबच्या फाशीच्या प्रक्रियेनंतरही सुरूच आहे... 

Updated: Jul 30, 2015, 02:37 PM IST
नेमकी कशी झाली होती याकूब मेमनला अटक...  title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याकूबनंतर याकूबला सुरक्षा यंत्रणांना पकडलं होतं की त्यानं आत्मसमर्पण केलं होतं? यावरून बराच वाद रंगला... हाच वाद याकूबच्या फाशीच्या प्रक्रियेनंतरही सुरूच आहे... 

भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, भारताचा शेजारचा देश असलेल्या नेपाळमधून याकूबला अटक करण्यात आली होती. अटक होण्याअगोदर याकूबनं नेपाळमध्ये १५ दिवस काढले होते. 

मेमन कुटुंबीय पाकिस्तानात
१२ मार्च १९९३ मध्ये १३ साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. महत्त्वाचं म्हणजे या बॉम्बस्फोटाचे पुरावे गोळा करणं हे पोलिसांसाठी मोठं जिकिरीचं काम होतं. हाती लागलेले काही पुरावे या स्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमनकडे इशारा करत होते. सोबतच, यावेळी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय'साठी काम करणारं संपूर्ण मेमन कुटुंबीयच पाकिस्तानात पोहचल्याचंही समोर आलं होतं.

भारत की पाकिस्तान.... दुविधेत होता याकूब
तत्कालीन मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश चंद ठाकुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर घाबरलेला याकूब पाकिस्तानातून भारतात परतण्याच्या विचारात होता. यासाठीच त्यानं पहिल्यांदा चुलत भाऊ उस्मान याच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर त्यानं दुबईत त्याची भेटही घेतली.

आत्मसमर्पणाचा विचार... 
स्फोटानंतर १७ महिन्यानंतर जुलै महिन्यात याकूबनं उस्मानला नेपाळला बोलावून घेतलं... उस्मान आणि वकिलांसमोर त्यानं आत्मसमर्पण करून दाखवण्याचा विचारही बोलून दाखवला. पण, अगोदर कुटुंबाला भारतात सुरक्षित पोहचवून मग आत्मसमर्पण करण्याचा विचार कर असा सल्ला त्याला मिळाला. 

हा सल्ला मानून १६ जुलै १९९४ रोजी याकूबला पुन्हा कराचीला परतायचं होतं... पण, याच दिवशी त्याला नेपाळच्या त्रिभूवन इंटरनॅशनल एअरपोर्टवर अटक करण्यात आली.

सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात
स्कॅनिंग करताना मशीनवर सुरक्षारक्षकांना त्याच्या बॅगेत भरपूर पासपोर्ट असल्याचं लक्षात आलं. बॅग उघडून सगळे पासपोर्ट दाखवण्याची सूचना त्याला करण्यात आली. यावेळी याकूब घामाघूम झाला. या बॅगमध्ये १० भारतीय पासपोर्ट होते... ही काही सामान्य बाब नव्हती. त्यानंतर नेपाळ पोलिसांनी याकूबला मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश चंद ठाकुरी यांच्यासमोर हजर केलं.

हे १० पासपोर्ट आपल्या कुटुंबीयांचे असल्याचं याकूबनं सांगितलं. हे सगळे पासपोर्ट मुंबई पोलिसांना हव्या असलेल्या मेमन कुटुंबीयांचे असल्याचं ठाकुरी यांच्या लक्षात आलं.

पर्याय निवडण्याचा प्रश्नच नाही... 
याकूबच्या अटकेत सहभागी असलेल्या रॉचे सदस्य बी. रमन यांच्या म्हणण्यानुसार, याकूब छुप्या पद्धतीनं काठमांडूमध्ये आला होता. यावेळी, त्याच्यासमोर दोन पर्याय होते... भारतात परण्याचा किंवा 'आयएसआय'च्या नियंत्रणात आणि निनावीपणे संपूर्ण आयुष्य जगण्याचा... पण, त्याला मार्ग निवडण्याचा पर्यायच उपलब्ध झाला नाही... कारण, भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या हाती तो लागला होता. 

अटकेनंतर टाडा कोर्टाचे न्यायाधीश जे एन पटेल यांनी दोषी ठरवल्यानंतर याकूबनं आपलं संतूलन गमावलं होतं. 'टायगर बरोबर होता... कुटुंबासोबत भारतात गेला तर तुला बळीचा बकरा बनवलं जाईल असं त्याचं म्हणणं बरोबरच होतं' असं म्हणत याकूबनं कोर्टात आरडाओरडही केली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.