नवी दिल्ली : अमेरिकेने जसं पाकिस्तानात जाऊन लादेनला ठार केलं होतं तशीच रणनिती भारतीय लष्कराकडून आखली गेली. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्काराने सर्जिकल स्ट्राइकसाठी जवानांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या.
लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेचे सैनिक जेव्हा पाकिस्तानात कारवाई करत होते तेव्हा त्याचे सगळे अपडेट राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मिळत होते. त्यांच्या देखरेखेखाली ही सगळी कारवाई झाली. त्याच प्रकारे भारतीय लष्काराची कारवाई ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्काराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या देखरेखे खाली झाली. पंतप्रधान मोदी देखील या कारवाईवर नजर ठेवून होते. या कारवाईत भारतीय लष्करातील सगळे जवान यशस्वी होऊन परतले.
भारतीय लष्कराने कशी केली कारवाई
१. भारतीय जवान एलओसी सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइकसाठी गेले.
२. भारतीय जवानांच्या ७ वेगवेगळ्या तुकड्यांना ही कारवाई यशस्वी केली.
३. भारतीय सेनेने यासाठी एमआई-३५ हेलिकॉप्टरचा वापर केला.
४. एमआई-३५ हॅलिकॉप्टच्या सहाय्याने जवान POK मध्ये उतरले.
५. जवान पॅरा ट्रूपिंकच्या सहाय्याने Pok मध्ये गेले.
६. भारतीय लष्कराने रात्री १२.३० पासून से सकाळी ४.३० पर्यंत हे ऑपरेशन पूर्ण केलं.
७. पीएम मोदी हे तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत या कारवाईवर लक्ष ठेवून होते.
८. भारतीय लष्कराने एलओसीमध्ये ३ किलोमीटर आत जाऊन कारवाई केली.
९. कारवाईत ३० ते ३५ जण ठार झाल्याची माहिती आहे.
१०. भारतीय जवानांना या कारवाईत कोणतीही दुखापत नाही झाली.