१२ वर्षांत पहिल्यांदाच एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 16, 2017, 03:38 PM IST
१२ वर्षांत पहिल्यांदाच एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद title=

नवी दिल्ली : भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. 

लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण ३५ अंशांच्या पलिकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच, तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येते दोन तीन दिवस हे अधिक तापदायक असणार आहेत.