हॉस्पिटलमध्येही 'घाणेरडी नजर', चेंजिंग रूममध्ये सापडला कॅमेरा

राजीव गांधी कँसर हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ माजलीय. एका महिला कर्मचाऱ्यानं तयार होत असतांना हे पाहिलं आणि नंतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Updated: Oct 22, 2015, 06:07 PM IST
हॉस्पिटलमध्येही 'घाणेरडी नजर', चेंजिंग रूममध्ये सापडला कॅमेरा title=

नवी दिल्ली: राजीव गांधी कँसर हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ माजलीय. एका महिला कर्मचाऱ्यानं तयार होत असतांना हे पाहिलं आणि नंतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

आणखी वाचा - 'एचआयव्ही' बाधित असल्याचं माहीत असूनही त्यानं जोडले 300 महिलांशी संबंध

हॉस्पिटलचे अधिक्षक संजीव गुप्ता यांनी सांगितलं की, एका कर्मचाऱ्यानं याची माहिती दिली. यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. एफआयआर दाखल केली गेलीय आणि तपास सुरू आहे. अनेकांची चौकशी केली जातेय.

आणखी वाचा - महिलेचे अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी केली अटक

पोलिसांचं म्हणणं आहे की, हिडन कॅमेरा सापडलाय आणि याच्या फुटेजची तपासणीही सुरू आहे. कॅमेऱ्यातून कुठं रेकॉर्डिंग होत होतं, किती दिवसांपासून कॅमेरा लागला होता आणि इथं त्याला कोण घेऊन आलं इत्यादी प्रश्नांचा तपास केला जाईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.