हैदराबाद बनलं फ्री वाय-फाय मिळवणारं पहिलं शहर!

तब्बल 17 ठिकाणी फ्री वाय-फाय सर्व्हिस सुरू करून हैदराबाद ‘पब्लिक वाय-फाय’ सेवा मिळवणारं पहिलं शहर ठरलंय. तेलंगना सरकारनं टेलिकॉम ऑपरेटर ‘भारती एअरटेल’सोबत हात मिळवणी करून जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलीय.  

Updated: Oct 11, 2014, 10:26 PM IST
हैदराबाद बनलं फ्री वाय-फाय मिळवणारं पहिलं शहर! title=

हैदराबाद : तब्बल 17 ठिकाणी फ्री वाय-फाय सर्व्हिस सुरू करून हैदराबाद ‘पब्लिक वाय-फाय’ सेवा मिळवणारं पहिलं शहर ठरलंय. तेलंगना सरकारनं टेलिकॉम ऑपरेटर ‘भारती एअरटेल’सोबत हात मिळवणी करून जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलीय.  

कंपनीच्या म्हणण्यानुसार, तब्बल 17 ठिकाणी यूझर्स दररोज 750 एमबी डेटा वापरू शकतात. या ठिकाणी इंटरनेटचा स्पीड 40 Mbps दिला गेलाय. इंटरनेटचा वापर करणाऱ्या युझर्सच्या संख्येमुळे वाय-फाय्या स्पीडमध्ये फरक पडू शकतो, असं भारती एअरटेलचे सीईओ (आंध्र प्रदेश आणि तेलंगाना) व्यंकटेशन विजयराघवन यांनी म्हटलंय. 

माधोपूर पोलीस स्टेशन, कोथागुडा जंक्शन आणि रहेजा मायंडस्पेस सर्कल या ठिकाणी पब्लिक वाय-फाय हॉटस्पॉट्सचे सायबर टॉवर्स लावण्यात आलेत. सरासरी ४० हजार लोकांना याचा फायदा घेता येऊ शकेल.

विजयराघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅलिड मोबाइल नंबर वापरणारे सगळेच युझर्स सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही... यासाठी त्यांना वाय-फाय ऑन करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. त्यानंतर त्यांच्या नंबरवर SMS पाठवला जाईल. यामध्ये युझर्सचं नाव आणि वन-टाईम पासवर्ड (OTP) पाठविले जातील. या पासवर्डवरू युझर्स फ्री वाय-फायचा वापर करू शकतील.  

प्रयोगधर्तीवर सध्या तरी हा प्रॉजेक्ट तीन महिन्यासाठी कार्यान्वित करण्यात आलाय. त्यानंतर यावर लोकांच्या प्रतिसादावर निर्णय घेतला जाईल. संपूर्ण हैदराबाद वाय-फाय सिटी बनविणं हे सरकारचे ध्येय असल्याचं तेलंगाना आयटी मिनिस्टर केटी रामा राव यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.